
पुणे : राज्य सरकारने पुण्याबाबत सादर केलेल्या माहितीवरून उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलेली असतानाच, कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांच्या ‘पुणे मॉडेल’चं केंद्र सरकारने आज कौतुक केलं. मार्चमधील पॉझिटिव्हीटी रेट ४१.८ वरून मे महिन्यात २३.४ पर्यंत खाली आणल्याबद्दल केंद्राने लक्ष वेधले आहे. (appreciation of Pune model from the Center Preventive measures reduce the rate of infection)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुण्यात हाहाकार माजल्याने नागरिकांना बेड, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळविण्यासाठी वनवन भटकावे लागत होते. ही साथ रोखण्यासाठी आणलेल्या निर्बंधामुळे व वैद्यकीय सुविधा वाढविण्याचे काम देखील करण्यात आले. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने खाली आलेली आहे. मात्र, उच्च न्यायालयात कोरोना संदर्भात दाखल केलेल्या जनहीत याचिकेच्या सुनावणीमध्ये पुण्यातील रुग्णसंख्या वाढली असून, बेड उपलब्ध नाहीत अशी माहिती राज्य सरकारच्या अधिवक्त्यांनी दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पुण्यातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
आरोग्य मंत्रालयातर्फे मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार केलेल्या कौतुकामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी केल्याने कोरोना संक्रमण कसे कमी झाले याची केसस्टडी म्हणून पुण्याचे उदाहरण देण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण ६९.७ टक्क्यांवर गेले होते. तेव्हा रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली. त्यानंतर २९ मार्च ते १२ एप्रिल या काळात १५ दिवसाच्या काळात आणखी बंधने आणल्यानंतर केसेस वाढण्याचे प्रमाण कमी झाल्याचे या काळात दिसून आले. हा लॉकाडाऊन लागण्यापूर्वी पुण्यात ४१.८ टक्के इतका पॉझिटीव्हीटी रेट होता आता तो २३.४ टक्के इतका कमी झाला आहे. पुण्यात मोठ्या प्रामाणात कोरोनाचे संक्रमण होत होते, तशी आता स्थिती राहिलेली नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच मुंबई महापालिकेने केलेल्या प्रयत्नांचेही कौतूक केले आहे.
हे नियम ठरले महत्त्वपूर्ण
- रात्रीची संचारबंदीने संक्रमण रोखले
- मास्कचा काटेकोर वापराचे बंधन
- लग्नकार्य, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर घातलेले निर्बंध
- अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसायांना ठराविक वेळेत परवानगी
- खासगी आस्थापनांमध्ये १५ टक्के उपस्थितीची मुभा
- अत्यावश्यक सेवेसाठीच सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर
पुणे मॉडेलवर बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटत असताना त्यात शहराचा मोठा वाटा आहे. टेस्टिंग, ट्रॅकिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीमुळेच हे शक्य झाले. सामुहिक प्रयत्नातून हे यश दिसून आले आहे.’’ तर महापालिका आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, ‘‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुणे महापालिकेने संक्रमण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि निर्बंध याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. या काळात पुणेकरांना केलेल्या सहकार्याने कोरोनाची साथ आपण रोखू शकलो. भविष्यात देखील शहर सुरक्षीत ठेवले जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.