esakal | नॉन कोविड पेशंटनं जायचं कुठं ? ससूनच्या शिकाऊ डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

apprentice resident doctor from sassoon and BJ medical collge will Start Protest

''गेल्या 1 वर्षांपासून थांबलेल्या नियोजित शस्त्रक्रिया व अतिविशेषपचार पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरु कराव्यात नॉन कोविड पेशंटने कुठं जायचं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला

नॉन कोविड पेशंटनं जायचं कुठं ? ससूनच्या शिकाऊ डॉक्टरांचा आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे : बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालयातील शिकाऊ निवासी डॉक्टरांचा आंदोलनाच्या तयारी आहेत. याबाबत 'मार्ड' संघटनेने मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनचा इशारा दिला आहे. दरम्यान, आज राज्यस्तरीय बैठक घेऊन याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी सकाळसोबत चर्चा केली. यावेळी बोलताना, ''गेल्या 1 वर्षांपासून थांबलेल्या नियोजित शस्त्रक्रिया व अतिविशेषपचार पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सुरु कराव्यात नॉन कोविड पेशंटने कुठं जायचं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ''निवासी डॉक्टर्स यांचे 1 वर्षांपासून थांबलेले विशेषज्ञ विभागाचे शिक्षण पूर्ववत करावे अशी मागणी केली. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास मार्ड संघटनेकडून कडक पाऊले उचलण्यात येतील व त्याची संपूर्ण जबाबदारी  सरकारची राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल

''आम्ही शिकाऊ डॉक्टर आहोत.जर सर्व काम कोविडच आम्हाला करावे लागत असेल तर आम्ही जेव्हा बाहेर पडू तेव्हा आम्हाला काही उपचार करता येणार नाहीत. सरकारने सर्व जबाबदारी आमच्यावर टाकली आहे, असे सांगत पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील शिकाऊ निवासी डॉक्टर्स यांच्या मार्ड संघटनेच्या वतीने covid/non covid या संदर्भातील निवासी डॉक्टर्स आंदोलनाच्या तयारीत आहेत.

हेही वाचा - कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांना राज्यातील जिम चालकांचा एकमुखाने पाठिंबा

ससूनमध्ये वाढत्या कोविड पेश्ंट पाहता वाढत्या बेडच्या प्रमाणात कंत्राटी डॉक्टर्स, स्टाफ, तंत्रज्ञ यांचीही तातडीने नेमणूक करा, तसेच अत्यंत हीन दर्जाच्या पीपीईकिटमुळे डॉक्टर्समध्ये संसर्ग वाढतोय, त्यामुळे चांगल्या दर्जाचे पीपीई किट द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

loading image