ईसीएचएसतर्फे लाभार्थ्यांना एका पल्स ऑक्सिमीटरच्या खर्चाचा परतवा देण्यास मंजुरी

echs
echs

पुणे - माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेच्या (ईसीएचएस) अंतर्गत लाभार्थ्यांद्वारे विकत घेण्यात आलेल्या पल्स ऑक्सिमीटरचे पैसे परत दिले जाणार आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबियासाठी केवळ एकाच पल्स ऑक्सिमीटरचा खर्च ईसीएचएस विभागा तर्फे परत केला जाईल. हा निर्णय संरक्षण मंत्रालय, माजी सैनिक कल्याण विभाग (डीएसइडब्ल्यू) तर्फे घेण्यात आला असून याबाबतची माहिती इसीएचएस सल्लागार समितीचे सदस्य रवींद्र पाठक यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्णाच्या आरोग्यविषयक नोंदी करताना रक्तात विरघळलेल्या ऑक्सिजनच्या प्रमाण मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा वापर करण्यात येतो. ईसीएचएस लाभार्थी कोरोनाबाधित असल्याचे चाचणीद्वारे आढळले तर त्यांना आपल्या कुटुंबासाठी एक पल्स ऑक्सिमीटर खरेदी करता येईल. या परिपत्रकानुसार कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना कोरोना झाला असेल तरी सुद्धा त्या कुटुंबाला केवळ एकच ऑक्सिमीटरच्या खर्चाचा परतावा मिळू शकतो. अशी माहिती पाठक यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्सिमेटर हे ऑक्सिजनची पातळी कमी झाले आहे हे वेळेवर शोधण्यासाठी नक्कीच मदत करणारे असून लाभार्थ्यांना संसर्ग होण्या पूर्वीच हे विकत घेण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी संरक्षण विभागाला पत्र पाठवले असल्याचेही पाठक यांनी यावेळी कळविले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com