
पुणे - महामेट्रोने कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम करताना नळस्टॉप चौकात उड्डाणपूल बांधला आहे. या कामासाठी पूर्वगणनपत्रकात निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च झाला असल्याचा दावा महामेट्रोने करून महापालिकेकडे वाढीव खर्चाच्या १४ कोटी रुपयांची मागणी केली होती. अखेर महापालिकेने ही रक्कम देण्यास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.