कोपर्डे हवेली : वेणुताई चव्हाण जन्मशताब्दी स्पर्धेत जागृतीचे यश...
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये
आराध्या, स्वरदाचे यश
कोपर्डे हवेली, ता. ४ : शिक्षण मंडळ बनवडी संचलित जागृती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थिनींनी वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.
वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये झालेल्या वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांत या शाळेने विशेष यश मिळवले. निबंध स्पर्धेत आराध्या जाधव हिने द्वितीय, तर स्वरदा कोळी हिने तृतीय क्रमांक पटकावला. दोन्ही विद्यार्थिनींना प्रमाणपत्र, चषक देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शंकरराव खापे, उपाध्यक्ष किशोर पाटील, सचिव बी. बी. कोठावळे, खजिनदार कांतिलाल पाटील, मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण, स्पर्धा प्रमुख आर. डी. कांबळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
B02388,
स्वरदा कोळी
B02389
आराध्या जाधव
.....................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

