शिष्यवृत्ती परीक्षेत अरण जि. प. शाळेचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत अरण जि. प. शाळेचे यश
Published on

MOD26A03386
अरण : जि. प. शाळेतील शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मान्यवर.

अरणच्या जि. प. शाळेतील ३९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

मोडनिंब, ता. २० ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी अन् सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अरण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. इयत्ता चौथीचे २४, तर सातवीचे १५ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

२०० हून अधिक गुण घेणारे गुणवंत : शौर्या पाटील, सृष्टी पाटील, स्वराली कांबळे, शिवगंगा कांबळे, श्रुती ढगे, सायली वसेकर (सर्व इयत्ता चौथी); तसेच स्वराली गाजरे, वैभवी कंगले, सानवी क्षीरसागर, लक्ष्मी माळी, पियुष मुसळे अन् श्रुती भवर (सर्व इयत्ता सातवी).
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अमोल पाटील, केंद्रप्रमुख संतोष गोरे अन् मुख्याध्यापिका शांता वाघमोडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्रिंबक राऊत, मेघा कोंडुभैरी, परमेश्वर सुरवसे अन् श्रद्धा लोंढे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com