

PNE26W46208
अहिल्यानगर ः आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स ॲण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन (एसा)ने अनामप्रेम संस्थेला संगणक भेट देताना पदाधिकारी.
----------------------
‘एसा’कडून ‘अनाम प्रेम’ प्रकल्पाला संगणक
अहिल्यानगर, ता. ३१ : आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स ॲण्ड सर्व्हेअर्स असोसिएशन (एसा) यांच्या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून संचालक मंडळ व संस्था सभासदांनी ‘अनाम प्रेम’ प्रकल्प भेट आणि रक्षाबंधन उपक्रम राबविला. ‘अनाम प्रेम’ संस्थेला एक संगणक भेट देण्यात आला.
निंबळक (ता.नगर) येथील खडकाळ डोंगरात, जिथे गवतही उगवणार नाही अशा ठिकाणी ‘अनाम प्रेम’च्या कार्यकर्त्यांनी अंध, अपंग व मूकबधीर मुलांसाठी नंदनवन उभे केले आहे. ‘अनाम प्रेम’मध्ये सध्या २३५ अंध, अपंग, मूकबधिर व गतिमंद मुले-मुली वास्तव्यास आहेत. पुणे, नगर व संभाजीनगर येथे संस्थेचे विविध प्रकल्प कार्यरत आहेत. अजित माने व अनिता माने तसेच संपूर्ण ‘अनाम प्रेम’ परिवार दिव्यांगांच्या विकासासाठी कार्यरत आहेत.
‘एसा’चे अध्यक्ष प्रदीप तांदळे, उपाध्यक्ष सुनील औटी, सचिव भूषण पांडव, संतोष खांडेकर, अनमोल जैन, साजिद शेख, अमोल येनगंदुल, संतोष राजापुरे, महेश तांदळे, रमेश बोऱ्हाडे, आदिनाथ आंबेकर, गौरव मांडगे, सचिन डागा, रोशन गुगळे, सागर ढगे, संदीप पाटील, रोहित लुणिया, राकेश राऊत हे सभासद व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार, महेश घावटे, नीता घावटे, प्रणाली तांदळे, वंदना कुलकर्णी, मोनाली बोरूडे, ॲड. किरण जाधव, प्रशांत आढाव, अनिल धोकरिया आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.