पुण्यात ईव्हीएमवरून वाद; मतमोजणी प्रक्रिया ठप्प 

EVM.jpg
EVM.jpg

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली असून पोलिसही तेथे मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम तेथे लवकरच येणार असल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच प्रत्येकाच्या घरांमध्ये टीव्ही सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. त्याचप्रमाणे टीव्हीवर "ब्रेकिंग न्यूज'चा धडाकाही ऐकू येत आहे. हेच चित्र रस्त्यांवरील हॉटेल्स, दुकानांमध्ये दिसत होते. अनेकजण रस्त्यावर उभे राहून तर काहीजण चहा व नाश्‍त्याचा आस्वाद घेत मतमोजणीच्या घडामोडींचा आढावा घेताना दिसत आहेत. मतमोजणी परिसरात युती व आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तसेच, प्रत्येकाचे मोबाईल फोन मिनटा-मिनीटाला खणखणत असून कोण आघाडीवर?, अशाच स्वरूपाचे फोन त्यांना येत आहेत. 

पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप-युतीचे उमेदवार गिरिश बापट 15 हजार 772 मतांनी आघाडीवर असल्याचे समजते. दरम्यान इव्हीएम मशिनला सील व्यवस्थित नसल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतल्यामुळे येथील मतमोजणी ठप्प झाली होती. पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली असून त्यामध्ये बापट 8 ते 10 हजार मतांनी आघाडीवर होते. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये 23 एप्रिल रोजी मतदान झाले. यामध्ये भाजप-शिवसेना युतीकडून गिरीश बापट, काँग्रेस आघाडीकडून मोहन जोशी तर वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव हे उमेदवार उभे होते. तब्बल महिनाभरानंतर आज गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस सुरवात झाली आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही मतमोजणी केंद्रावर गर्दी केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार जागांसाठी आपले नशीब अजमावणाऱ्या पालकमंत्री बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, पार्थ अजित पवार यांच्यासह 93 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला आज होणार आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत झालेल्या चुरशीच्या लढतींमुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
पुणे जिल्ह्यातील चार जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक झाली होती. पुणे शहरात 10.34 लाख (49.84 टक्के), मावळमध्ये 13.66 लाख (59.49 टक्के) शिरूरमध्ये 12.92 लाख (59.46 टक्के), तर बारामतीमध्ये 12.99 लाख (61.54 टक्के) मतदान झाले. यंदा प्रथमच मतदानाच्या वेळी "व्हीव्हीपॅट'चा वापर करण्यात आला. पुण्यात भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात थेट लढत होत आहे. 

मतदारसंघात असे आहेत उमेदवार 
पुणे : 31 
मावळ : 21 
बारामती : 18 
शिरूर : 23 

ब्रेकिंग न्यूजचा धडाका... 
लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळी साडेसात-आठ वाजेपासूनच प्रत्येकाच्या घरांमध्ये टीव्ही सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. त्याचप्रमाणे टीव्हीवर "ब्रेकिंग न्यूज'चा धडाकाही ऐकू येत होता. घराघरांतील चित्र रस्त्यांवरील हॉटेल्स, दुकानांमध्ये दिसत होते. अनेकजण रस्त्यावर उभे राहून तर काहीजण चहा व नाश्‍त्याचा आस्वाद घेत मतमोजणीच्या घडामोडींचा आढावा घेताना दिसत आहेत. मतमोजणीत कोणाची आघाडी तर कोणी मागे असल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद तर अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजीही दिसत होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com