
पुणे : वडील बांधकाम मजूर म्हणून काम करतात तर आई इतरांकडे घरकाम करून कुटुंबाला हातभार लावले. अशा जाधव दांपत्याची मुलगी अर्चनाने रविवारी सकाळने आयोजित केलेल्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या शर्यतीत श्रेष्ठत्व सिद्ध करताना अव्वल स्थान मिळविले.