उरुळी कांचन - किरकोळ कारणावरून दोन व्यक्तींनी लष्कराच्या जवानाला मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन येथे शनिवारी (ता. ३१) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन व्यक्तींवर उरुळी कांचन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.