esakal | पुण्यात सुरक्षारक्षकास वाचविण्यासाठी लष्करी अधिकाऱ्याचा हवेत गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

Firing_3.jpg

कामाच्या वादातून सोसायटीच्या सुरक्षारक्षकावर तिघांनी लोखंडी गज व बांबूने बेदम मारहाण केली. या घटनेच्यावेळी सोसायटीतील रहीवासी लष्करी अधिकाऱ्याने मारहाण करणाऱ्यांची समजूत काढल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही.

पुण्यात सुरक्षारक्षकास वाचविण्यासाठी लष्करी अधिकाऱ्याचा हवेत गोळीबार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कामाच्या वादातून सोसायटीच्या सुरक्षारक्षकावर तिघांनी लोखंडी गज व बांबूने बेदम मारहाण केली. या घटनेच्यावेळी सोसायटीतील रहीवासी लष्करी अधिकाऱ्याने मारहाण करणाऱ्यांची समजूत काढल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही. अखेर लष्करी अधिकाऱ्याने सुरक्षारक्षकाचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ही घटना उंड्री येथील कडनगरमधील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये रविवारी रात्री घडली. 

मोहंमद मैनुल्ला शहिदअली सिध्दीकी (वय 26, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धीकी यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद मैनुल्ला हे उंड्रीतील 'ओव्हीओ लश लाईफ' या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस आहेत. त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांसमवेत त्यांची दिवस व रात्रपाळी करण्याच्या वादातून भांडणे झाली. त्यावेळी दोघांनी फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर रविवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या त्या दोघांसह एक साथीदार असे तिघेजण लोखंडी गज व बांबू घेऊन सोसायटीमध्ये आले. त्यांनी फिर्यादीस लोखंडी गज व बांबूने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी सोसायटीमध्ये राहणारे लष्करी अधिकारी सुरक्षारक्षकाच्या मदतीला धावले. 

मारहाण करणाऱ्यांना सुरक्षारक्षकास मारु नये असे बजावले. तसेच त्यास मारु नका, नाहीतर मी तुमच्यावर बंदुकीतुन गोळी घालेल, अशी भीतीही दाखविली. तरीही तिघांनी दुर्लक्ष करीत फिर्यादीस मारहाण सुरू ठेवली. या प्रकारामुळे चिडलेल्या लष्करी अधिकाऱ्याने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर आरोपींनी घाबरुन तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

loading image
go to top