बारामतीत बारा ठिकाणी विशेष शौचालयांची व्यवस्था

मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी माहिती दिली
Arrangement of special toilets at twelve places in Baramati
Arrangement of special toilets at twelve places in Baramati

बारामती - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी बारामती शहरात स्वच्छता रहावी या दृष्टिकोनातून बारा ठिकाणी विशेष शौचालयांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

यामध्ये सराफ पेट्रोल पंप शेजारी मोकळी जागा, नेवसे रोडवर नगरपालिका स्वच्छतागृहाच्या पाठीमागील बाजूला, ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाशेजारी निरा डाव्या कालव्यालगत, शिवकृपा हाउसिंग सोसायटी शेजारील मोकळी जागा, दाते गणपती मंदिरा जवळ कऱ्हा नदीच्या पात्रा शेजारी, मार्केट यार्ड मध्ये विहिरीजवळ व सेल हॉल शेजारी, इंदापूर रोडवर मोतीबाग, देसाई इस्टेट मधील मोकळी जागा, तुपे बंगल्याशेजारी नीरा डावा कालव्यालगत, सुदीत हॉटेल समोर अंबिकानगर, रिमांड होम ते नटराज नाट्यमंदिर या दरम्यान सेवा रस्त्यावर, तसेच सांस्कृतिक केंद्रा समोर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

वारकरी किंवा भाविकांना काही अडचण आल्यास राजेंद्र सोनवणे 94 210 54 333, अजय लालबिगे 94 218 78 941, सुभाष नारखेडे 90 116 85 464 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारामती शहर हे स्वच्छ सुंदर व हरित असावे या दृष्टीकोनातून अधिकाधिक लोकांनी या शौचालयांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com