पुणे - डॉक्टर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका डॉक्टरला पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली..डॉ. कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. उमराणी रस्ता, शंकर कॉलनी, जत, जि. सांगली, सध्या रा. पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सावंत याने त्याचे पूर्वी लग्न झालेले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे दाखवून लग्नासाठी नोंदणी केली होती. तरुणीच्या वडिलांनी स्वतः जावून डॉक्टर मुलाची भेट घेतली..परंतु त्याचे वागणे आणि दवाखाना योग्य न वाटल्याने त्याला नकार कळविला. त्यानंतरही फिर्यादी पोपट फडतरे यांची मुलगी डॉ. पल्लवी हिला मोबाईलवर परस्पर संपर्क केला. तिच्याशी मैत्री करुन, तो अविवाहित असल्याचे भासवून लग्न करण्याचे आमिष दाखवले. डॉक्टर तरुणीकडून १० लाख रुपयांहून अधिक रक्कम घेतली. परंतु ती परत केली नाही. या मानसिक त्रासामुळे डॉ. पल्लवीने आत्महत्या केली..याप्रकरणी बिबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शशांक जाधव यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करून डॉ. सावंत याला नवी मुंबई येथून अटक केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.