रॉयल चोरटा : चोरी करण्यासाठी पठ्ठ्या विमानातून फिरायचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

पिंपरी : विमानाने उत्तर प्रदेश येथून येऊन वाकड, थेरगाव परिसरात चोऱ्या करणाऱ्या अनिल मिश्री राजभर (वय 36, रा. उत्तर प्रदेश) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 25 तोळे सोने, लॅपटॉप असा सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

याबाबत अक्षय रवींद्र मिश्रा आणि मनीषा गणेश बन्ने यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मिश्रा यांच्या घराचे कुलूप तोडून 90 ग्रॅम, तर थेरगाव येथील बन्ने यांच्या घरातून 137 ग्रॅम वजनाचे दागिने चोरीस गेले होते.
 
दरम्यान, पोलिसांनी परिसरातील हॉटेलमध्ये केलेल्या तपासणीत राजभर याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrest to thief Who use AeroPlane for Theft