Sadabhau Khot and Raju Shetty
sakal
पुणे - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी साखर संकुल येथे झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडीप्रकरणी न्यायालयीन सुनावणीस हजर न राहिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याविरोधात काढण्यात आलेले अटक वॉरंट आज न्यायालयाने रद्द केले. सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा आदेश दिला.