
'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा पदाधिकारी असल्याचे भासवून एकाने आर्ट ऑफ लिव्हींगची त्याच्या बोगस कंपनीसमवेत वेळोवेळी कार्यशाळा भरवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीने एका नागरिकास जागेमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगून त्याची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
पुणे - 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा पदाधिकारी असल्याचे भासवून एकाने आर्ट ऑफ लिव्हींगची त्याच्या बोगस कंपनीसमवेत वेळोवेळी कार्यशाळा भरवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. आरोपीने एका नागरिकास जागेमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगून त्याची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केली होती.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रणय उदय खरे (वय 28 , रा. साळुंखे विहार, कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अश्विनीकुमार बळिराम कांबळे (वय 44, रा.औंध) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेकडून नागरिकांना ध्यानधारणेचे प्रशिक्षण देते. त्याच्या भारतातील विविध भागांसह पुण्यातही शाखा आहेत. आरोपी खरे याने "आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेत प्रवेश मिळवून जिल्हा विकास समन्वयक (डीसीसी) या पदावर असल्याचा बनाव केला. त्यानंतर त्याने संबंधित संस्थेच्या त्याने सुरू केलेल्या जे.के.व्हेंचर्स या कंपनीसमवेत कार्यशाळा घेत होता. त्यानंतर त्याची कंपनी ही आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेशी संबंधित असल्याचे सांगत नागरिकांना त्याच्याकडील वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीच्या योजना सांगत लोकांचा विश्वास प्राप्त करीत असे. त्यानंतर नागरिकांकडून मोठमोठ्या रकमा स्वीकारून त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करीत असे. दरम्यान, त्याने त्याच्या जे.के.व्हेंचर्स या कंपनीमार्फत तो गुंतवणूकदारांना जादा नफा देण्याचे आमिष दाखविले.
रत्नागिरीतील खेड येथे सात हजार एकर जागेच्या प्रकल्पात 15 वर्षांकरिता एका एकर जागेसाठी गुंतवणूक केल्यास पहिल्या 11 गुंतवणूकदारांना एक कोटी रुपये, त्यानंतर येणाऱ्या 50 गुंतवणूकदारांना 50 लाख रुपये आणि उर्वरित गुंतवणूकदारांना 40 लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. याबरोबरच मोरींगा झाडे लावण्याच्या प्रकल्पात पैसे गुंतविल्यास जादा नफा मिळेल, असे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्याने त्यांच्याकडून एक कोटी 45 लाख रुपयांची त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा जादा परतावा न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलिस उपनिरीक्षक दीपक माने करीत आहेत.
Edited By - Prashant Patil