घातक शस्त्र घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
घातक शस्त्र घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा जेरबंद

घातक शस्त्र घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा जेरबंद

उंड्री - घातक शस्त्र घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्याच्या गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक-२ने मुसक्या आवळल्या. हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरजवळ कारवाई करून त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त केला.

आकाश दत्तात्रय कोठावळे (वय २५, रा. स.न. २३१, डी. विंग, फ्लॅट न.७ निलेश प्रिस्टेज सोसायटी, काळेपडळ, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२चे अधिकारी-कर्मचारी शहराच्या पूर्व विभागाच्या हद्दीत रेकॉर्डवरील वाहनचोर व तडीपार, फरारी पाहिजे आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी हडपसरमधील ग्लायडिंग सेंटर ग्राऊंडचे भिंतीजवळ संशयित घातक शस्त्र घेऊन थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ३०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता मिळून आला. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी मुद्देमालासह हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा: इंगवलीत निवडणूक घेवून निवडला तंटामुक्त समितीचा अध्यक्ष

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, सहायक पोलीस फौजदार उदय काळभोर, पोलीस हवालदार राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, पोलीस नाईक सुदेश सकपाळ, मनोज खरपुडे, गणेश लोखंडे, पोलीस शिपाई अमोल सरतापे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.