पुणे - पतीचा खून करून राजस्थानमधून पसार झालेल्या महिलेसह तिच्या मित्राला बंडगार्डन पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. पाली जिल्ह्यातील सोजत सिटी गावात ही घटना घडली होती.
सुखीदेवी कमलेश मेवाड (वय-३०) आणि अशोक काळूराम राठोड (वय-२५, दोघे रा. सोजत सिटी, जि. पाली, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कमलेश जेठाराम मेवाड (वय-३२) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कमलेशचे वडील जेठाराम मेवाड यांनी सोजत सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेठाराम यांचा मुलगा कमलेशचा मृतदेह २० फेब्रुवारी रोजी शेतात आढळून आला होता. तपासात कमलेशचा खून पत्नी सुखीदेवी आणि तिचा मित्र अशोक यांनी केल्याची माहिती सोजत सिटी पोलिसांना मिळाली.
या खून प्रकरणातील आरोपी महिलेसह तिचा मित्र पुणे रेल्वे स्थानक परिसरात आल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली.
अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त दीपक निकम यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, ज्ञानेश्वर गायकवाड, ज्ञानेश्वर बडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.