पुणे मार्केट यार्डात अफगाणिस्तानच्या कांद्याची आवक

Arrival of Afghan onions at Pune Market Yard
Arrival of Afghan onions at Pune Market Yard

मार्केट यार्ड(पुणे) : बाजारात गुरूवारी (ता.5) राजशेखर पाटील यांच्या गाळ्यावर 50 टन कांद्याची आवक झाली आहे. त्यापैकी 25 टन मालाची विक्री झाली असून उर्वरित 25 टन माल अद्याप विक्रीसाठी उपलब्ध आहे. केंद्र सरकारने कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी परदेशातून कांदा आयातीचे धोरण स्विकारले आहे.

मार्केट यार्डात अफगाणिस्तानच्या कांद्याची आवक झाली. तसेच 16 तर 20 नोव्हेंबरच्या दरम्यान मुंबईतील बंदरावर विविध देशातून साधारणतः 1600 कंटेनर कांदा उतरणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे. परंतु तिखटपणा कमी असणे, तसेच चवदार ग्रेव्ही बनत नसल्याने या कांद्याच्या खरेदीकडे हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींने पाठ फिरविली आहे. हैदराबाद येथील व्यापाऱ्यांनी या कांद्याची खरेदी केली असून, आणखी माल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी राजशेखर पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

दरम्यान रविवारी 100 ते 125 गोणी नवीन कांद्याची आवक बाजारात झाली. नवीन कांद्यास किलोस घाऊक बाजारात 10 ते 40 रुपये भाव मिळत आहे. जुन्या कांद्याला किलोसाठी 20 ते 55 रुपये मोजावे लागत आहे. रविवारी येथील बाजारात सुमारे 30 ट्रक जुन्या कांद्याची आवक झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अफगाणिस्तानच्या कांद्याला किलोस 35 रुपये भाव मिळत आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील दोन महिने कांद्याचे भाव तेजीत राहणार असल्याचा अंदाज पाटील यांनी वर्तविला आहे. नाशिक येथील बाजारात घडलेल्या घडामोडीनंतर कांद्याचे भाव घसरले आहेत. त्याचा फटका अफगाणिस्तानच्या कांदा विक्रीला बसला आहे. अफगाणिस्तानच्या भावातच भारतीय कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफगाणिस्तानचा कांदा खरेदी करण्याचे टाळल्याचे दिसून येत आहे.


देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com