पुण्यात विघ्नहर्त्याचे आगमन 

सकाळ संवाद
बुधवार, 17 जुलै 2019

पुणे : गणेश भक्तांची आतुरता शिगेला पोहोचली असताना गणेश उत्सव सोहळ्याला 48 दिवस शिल्लक असताना शाडू मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पेण शहरातून गणेश मूर्तींच्या पहिल्या गाडीचे पुणे शहरात आगमन झाले आहे.

पुणे : गणेश भक्तांची आतुरता शिगेला पोहोचली असताना गणेश उत्सव सोहळ्याला 48 दिवस शिल्लक असताना शाडू मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पेण शहरातून गणेश मूर्तींच्या पहिल्या गाडीचे पुणे शहरात आगमन झाले आहे. 

सोमवारी सायंकाळी पौड रस्त्यावरील आनंदनगर मधील गणेश मूर्ती विक्रेते सुबोध महाजन यांच्याकडे गणरायाच्या मूर्तींचे सर्वप्रथम आगमन झाले आहे कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती ट्रान्सपोर्ट खर्च यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्तींच्या किमती सुमारे 30 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरामध्ये गणेश मूर्तींच्या आगमनाने गणेश उत्सवाची चाहूल लागली आहे. पुणे शहरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस अपेक्षा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मुर्तींना गणेश भक्तांची अधिक पसंती असते. त्यामुळे पेणहून शाडू मातीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येते. 

यंदाच्या वर्षीही शहरातील गणेश मुर्ती विक्रेत्यांनी प्रेम मधील गणेश मूर्ती तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये शाडू मातीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात ऑर्डर देऊन बुकिंग केले आहे .मात्र गणेश मूर्तींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत यंदाच्या वर्षी पेणमधील कामगारांनी लालबागचा राजा ,पुणेरी पगडी ,टिळक पगडी यासारख्या प्रसिद्ध गणेश मूर्ती ही छोट्या आकारांमध्ये शाडू माती तयार केल्या आहेत त्यामुळे शाडू माती मध्ये ही आकर्षक आणि प्रसिद्ध मूर्ती उपलब्ध होणार आहे या महिन्याच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात शहरातील विक्रेत्यांकडे पेन मधील शाडू मातीच्या मूर्तींचे आगमन होणार आहे . 

याबाबतीत बोलताना गणेश मूर्ती विक्रेते सुबोध माझं म्हणाले शाडू माती मध्ये टिळक पगडी पुणेरी पगडी यासारख्या प्रसिद्ध मूर्ती तयार करण्यात आल्याने नागरिकांना शाडू मातीच्या गणेश मुर्ती खरेदी करण्यासाठी कल वाढणार आहे आमच्याकडे केवळ पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची विक्री करण्यात येते .यातील अनेक मूर्ती अमेरिका युरोप या ठिकाणी पाठवण्यात येतात.गणेशमूर्तींचे आगमन झाल्याने आजपासून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे . 

पर्यावरण पूर्वक गणेश मूर्तींचे भक्तांना मिळाव्यात यासाठी विक्रेते करणार प्रयत्न. 
गेल्या काही वर्षापासून काही गणेश विक्रेते शाडू मातीच्या मूर्ती म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची विक्री करीत भाविकांची फसवणूक करतात ही मूर्ती अर्धी शाडू मातीत व अर्धी प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये असल्याचे सांगत भाविकांची फसवणूक करतात. वास्तविक शाडू मातीची मूर्ती केवळ एकाच माती तयार करता येते .तसेच अडीच फूट ते तीन फुटापर्यंत शाडू मातीची मूर्ती तयार होते.आणि आणि ही मूर्ती वजनाने जड असून हाताळण्यास अवघड आहे. भाविकांना शाडू मातीची मूर्ती योग्य मिळावी .यासाठी कोथरूडमधील विक्रेते जनजागृती करणार आहेत. 

पत्रव्यवहाराची 32 वर्षांची परंपरा 
गणेश मूर्ती विक्रेते सुबोध महाजन यांच्याकडे गणेश मूर्तींचे आगमन झाल्यानंतर त्यांच्याकडे गणेश मूर्ती खरेदी करणाऱ्या गणेश भक्तांना माझं पत्रव्यवहार करून माहिती देतात ही ही परंपरा सुमारे बत्तीस वर्ष अविरतपणे सुरू आहे. 

शाडू मातीची गणेश मुर्ती उंची 6 इंच ते 2 फूट 
शाडु मातीच्या गणेश मूर्तीची किंमत 500 रुपये ते 2500 रुपये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrival of Ganesh idol in pune