गणेशभक्तांची ओझरला पसंती 

Ganpati
Ganpati

जुन्नर तालुक्‍यातील ओझरचा विघ्नहर गणपती हे अष्टविनायकातील अग्रमानांकन असलेले तीर्थक्षेत्र कुकडी नदीच्या तीरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसले आहे. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून येथे अद्ययावत सुविधांची उपलब्धता आहे. त्यामुळे भक्तगण ओझरलाच प्रथम पसंती देतात. भक्त निवासाच्या एकूण चार इमारतींमध्ये एकाच वेळी 1200 लोक राहू शकतात. येथील परिसर स्वच्छतेसाठी सफाई कामगार व घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीची सुविधा आणि सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्प उभारला आहे.

विजेच्या भारनियमनमुक्तीसाठी जनरेटर व 45 किलो मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प आहे. काळाची गरज ओळखून वातानुकूलित निवासस्थाने, अत्यल्प दरात महाप्रसाद, ऑनलाइन बुकिंग, वाहनतळ, दर्शन व अभिषेक वितरण व्यवस्था, देणगी कक्ष, हिरकणी कक्ष, रुग्णवाहिका, मोफत वैद्यकीय सुविधा, पिण्याचे शुद्ध पाणी आणि सीसीटीव्ही या सुविधा पुरविण्याकडे देवस्थानचा कटाक्ष आहे. मंदिराच्या परिसरातील बागबगीचा, परिसरातील सुंदर इमारती व कुकडी नदीच्या येडगाव जलाशयाचे नितळ पाणी ओझरच्या सृष्टीसौंदर्यात अधिकची भर घालत आहे. गणेशभक्तांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून देवस्थानचे विश्वस्त व सेवक काम करतात. 

सामाजिक बांधिलकीचे जतन 
देवस्थानच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हजार सामुदायिक विवाह यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले. सामुदायिक विवाहांसाठी 60 हजार चौरस फुटांचे भव्य सांस्कृतिक भवन उभारले आहे. तसेच, कमीतकमी खर्चात सामुदायिक व वैदिक विवाह व्यवस्था करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार गरिबांसाठी मोफत विवाहाचे आयोजन करण्यात येते. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश दिले जातात. खेळाडूंना क्रीडा स्पर्धांसाठी प्रवास सुविधा आणि दहावी व बारावीच्या 85 टक्‍क्‍यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत करण्यात येते. परिसरातील नागरिकांना अंत्ययात्रेच्या धार्मिक विधीसाठी स्वर्गरथ वाहनाची सुविधा उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com