
कागदापासून वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची मॉडेल्स तयार करण्याचं माधव सहस्रबुद्धे यांचं कौशल्य थक्क करणारं आहे. कागदाच्या चरख्यावर ते सूतकताई करू शकतात. नक्षीदार जाळी, थ्रीडी ग्रीटिंग कार्ड, गरगर फिरणाऱ्या कागदी ब्लॉक्सची गंमत अशा कितीतरी गोष्टी करण्याचा त्यांना छंद आहे.
कागदापासून वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांची मॉडेल्स तयार करण्याचं माधव सहस्रबुद्धे यांचं कौशल्य थक्क करणारं आहे. कागदाच्या चरख्यावर ते सूतकताई करू शकतात. नक्षीदार जाळी, थ्रीडी ग्रीटिंग कार्ड, गरगर फिरणाऱ्या कागदी ब्लॉक्सची गंमत अशा कितीतरी गोष्टी करण्याचा त्यांना छंद आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विविध प्रकारच्या यंत्रांची मॉडेल्स चक्क कागदापासून तयार करण्याचा छंद पुण्यातील माधव सहस्रबुद्धे यांनी जोपासला आहे. ते म्हणाले, ‘‘मी मॅकेनिकल इंजिनिअर असून, निवृत्तीनंतर कागदाच्या तऱ्हेतऱ्हेच्या कलाकृती बनवण्याचा छंद मला आनंद देणारा ठरला आहे. कागदापासून यंत्रांची दहा- बारा मॉडेल्स बनवली आहेत. ती चालवता येतात. त्या-त्या यंत्रात कोणकोणते घटक आहेत, ते कशा पद्धतीने काम करतात, हे या मॉडेल्सवरून शालेय विद्यार्थ्यांना समजावून घेता येतं. या जपानी कलेला ‘काराकुरी’ या नावाने ओळखतात. ‘किरिगामी’ या आगळ्यावेगळ्या कलापद्धतीत कागदाला घड्या पाडून, विशिष्ट जागी कापून त्रिमिती (थ्रीडी) रचना करता येतात. यानुसार मी अनेक पॉपअप भेटकार्डे तयार केली आहेत. त्यांत उंच इमारतीच्या खिडक्या, पायऱ्या वगैरे पाहायला मौज वाटते. मूव्हिंग ब्लॉक्स या प्रकारात कागदाचे ठोकळे सेलो टेपने जोडायचे असतात. ते फिरवल्यावर मजेशीर आकृतिबंध पाहायला मिळतात.’’
सहस्रबुद्धे यांनी असंही सांगितलं की, बारीक तुकडे जुळवित मी जाळीदार रचना तयार केल्या आहेत. वरवर पाहता जाळी दिसत असली तरी तिच्यातील अंतर्गत सौंदर्यपूर्ण रचना असते. या कलाप्रकारातून उत्कृष्ट चित्रकृती साकारता येतात. त्या फ्रेम करून लावता येतात किंवा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लावल्यावरही छान दिसतात. लाकडी चरख्यावर सूतकताई करण्याची मला आवड आहेच, पण मी कागदापासून एक चरखा तयार केला आहे. त्यावर सूतकताई करता येते. स्वतःच्या हाताचं कौशल्य वाढवणं आणि ते कायम वाढवत राहाणं, हे व्हायला हवं. पुढे जाण्याची ऊर्मी तेवत ठेवण्यासाठी अशा कला व कारागिरी फारच उपयोगी पडतात.