निनाद अमेय गोखले हा दहा वर्षांचा मुलगा पोहणं, स्केटिंग, रूबिक क्यूब, बुद्धिबळ यांसारख्या खेळांमध्ये विलक्षण रमतो. शास्त्रीय संगीत गायन व हार्मोनिअमवादन या दोन्ही कला तो स्वतंत्रपणे आणि एकत्रितही झोकात सादर करतो. वाचनाबद्दल तर प्रश्नच नाही. त्यांतील निवडक कविता आणि उतारेही तो खुबीने प्रस्तुत करतो, आणि हो ... तो म्हणतो, ‘मी अभ्यासही करतो, बरं का!’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
निनाद आता पाचवीत जाणार आहे. तऱ्हेतऱ्हेच्या खेळांमधली लय आणि शास्त्रीय संगीत आत्मसात करण्यासाठी लागणारं निराळंच बुद्धिबळ त्याच्याकडे आहे. रूबिक क्यूब, कॅरम व बुद्धिबळासारख्या खेळांची त्याला प्रचंड आवड आहे. याचा अर्थ असा नाही की, तो फक्त बैठे खेळच खेळतो. स्केटिंगसारख्या एकाग्रता गरजेची असणाऱ्या खेळातही तो तेवढाच रमतो. भरपूर दमछाक होईपर्यंत पोहण्याचा सराव करतो. तो म्हणाला, ‘‘मी हे सगळं करताना शाळेतील अभ्यासही मन लावून करतो. त्यात अजिबात मागे राहत नाही. वर्षभर मी अभ्यास आणि खेळ, गाणं, हार्मोनिअमवादन, पुस्तकवाचन यांचं वेळापत्रक सांभाळतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मला हे सगळे छंद जोपासायला खूप वेळ मिळतो. आत्ताच्या सुट्टीतही मी गायन, वादन आणि खेळाची मजा हवी तेवढी घेतली आहे.’’
निनादच्या आई, रेवती यांनी सांगितलं की, पोहण्याच्या स्पर्धांसाठी निनादची कसून तयारी भूपेंद्र आचरेकर हे करून घेत आहेत. साडेचार वर्षांचा असतानापासून तो पोहण्याची मौज अनुभवत आला आहे. दोन - अडीच तास तो पोहत असतो. बुद्धिबळही साधारण त्याच वयापासून खेळतो आहे. यासाठी त्याला मनोज कुलकर्णी यांचं मार्गदर्शन मिळतं आहे. निनादला किती तरी स्तोत्रंही ऐकून ऐकून पाठ झाली आहेत. एखादं गाणं सात-आठ वेळा ऐकलं की, ते त्याला शब्द आणि सुरावटीसह पाठ होतं. निरीक्षणशक्ती, ग्रहणशक्ती व स्मरणशक्ती अशा उपजत देणग्या त्याला लाभल्या आहेत. त्याला न कंटाळता मेहनतीची जोड तो देतो, हे पाहून समाधान वाटतं. अडीच वर्षांपासून तो सौमित्र क्षीरसागर यांच्याकडे हार्मोनिअमवादन आणि अलीकडेच अनुराधा कुबेर यांच्याकडे गाणं शिकतो आहे.