Artificial Coloring Used in Fried Peas
sakal
पुणे - भेसळखोरांकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ सूरू असून खाद्यपदार्थ अधिक आकर्षक दिसावेत यासाठी पदार्थांमध्ये कृत्रिम रंग बिनदिक्कतपणे मिसळला जात असल्याचे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए, अन्न विभाग) नऱ्हे येथे एका फरसाणाच्या दुकानावर तपासणी केली असता तेथे तळलेल्या वाटाण्यांमध्ये कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. तर काही कंपन्या विनापरवाना अन्नपदार्थ विक्री करत असल्याचे आढळून आले आहे.