Police Recruitment
sakal
पुणे - पोलिस भरतीप्रक्रियेत आणखी पारदर्शकपणा येण्यासाठी पुणे पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यात येणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. परीक्षेत ‘फेस रेकग्निशन’ कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे लेखी, मैदानी चाचणी स्पर्धेत तोतया उमेदवार सहभागी होत असल्यास त्याला थांबवता येणार आहे.