बारामती - कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी खर्चात अधिक शेती शक्य आहे, ही बाब बारामतीतील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगप्रसिद्ध कंपनीच्या मदतीने सिद्ध करून दाखविली आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नाडेला यांनी बुधवारी (ता. ८) दिल्ली येथे या प्रकल्पाची दखल घेत, ‘भविष्यात हा प्रकल्प भारतातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल,’ अशी अपेक्षा व्यक्त केली.