
पुणे : दक्षिण पुण्यात नागरिकांवर लादलेली पाणीकपात ही नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित आहे. पाणीगळती, चोरी आणि प्रशासनाच्या नियंत्रणाच्या अभावामुळे कृत्रिम टंचाईचा बोजा सामान्य जनतेवर टाकला जात आहे. ही अन्यायकारक पाणीकपात त्वरित मागे घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने दिला.