

शिरूर - ज्या घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून शहराची पाणीपुरवठा योजना राबविली आहे, तो बंधारा पाण्याने तुडूंब भरलेला असताना आणि गेले दोन दिवस शहर व परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली असतानाही शहरवासियांना मात्र सलग दोन दिवस पाण्यावाचून काढावे लागले. या कृत्रिम पाणीटंचाईला शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील जुनी पाईप लाईन फुटण्याचे कारण दिले जात असले; तरी पाणीपुरवठ्यासारख्या महत्वाच्या विषयातील नगर परिषदेचे अनियोजन, अनास्थेबरोबरच कुठलीही खबरदारी किंवा पूर्वतयारी नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.