
पुणे: शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला कुख्यात गुंड अरुण गवळीचा पी.ए. बोलत असल्याची बतावणी करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका तोतया टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले. अटक करण्यात आलेले तिघेही बीडचे रहिवासी आहेत.