

Major Political Shift in Ambegaon Taluka
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते अरुण गिरे यांनी पुणे येथे आज सोमवारी शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.