पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार तिहेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune graduate constituency election analysis

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यामध्ये आहेत. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या वेळेस सुमारे पंधरा टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची संख्या वाढली असल्यामुळे मतदानाचा टक्काही वाढण्याची चिन्हे आहेत.

पुणे पदवीधर मतदार संघाची निवडणूक होणार तिहेरी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे, तर औरंगाबाद मधुन विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी सकाळी जाहीर केले.

पुणे पदवीधर  मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भारतीय जनता पक्षाचे संग्रामसिंह देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपाली पाटील ठोंबरे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे पुण्यातील निवडणूक तिहेरी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील निवडणुकीबाबत शिवसेनेने भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. लाड आणि देशमुख हे सांगलीचे असून पाटील या पुण्याच्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 

दरम्यान, तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. मनसेच्या रुपाली पाटील यांनी साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांची नुकतीच तेथे जाऊन भेट घेतली. त्याच प्रमाणे कोल्हापूरमध्ये ही ही छत्रपती संभाजी महाराजांची त्यांनी भेट घेतली आहे. मतदार संघातील प्रचाराची पहिली फेरी त्यांनी पूर्ण केली आहे. संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी पुण्यामध्ये मेळावा आयोजित केला आहे. त्यात कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे 13 नोव्हेंबरला छाननी होणार आहे. पुण्यातील निवडणुकीसाठी चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, या निवडणुकीसाठी पक्षाने पुण्यातून उमेदवार दिला नसल्यामुळे निवडणुकीचा निकाल कसा लागेल याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यामध्ये आहेत. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या वेळेस सुमारे पंधरा टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची संख्या वाढली असल्यामुळे मतदानाचा टक्काही वाढण्याची चिन्हे आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. 
 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top