तरुणांकडून देश भयमुक्त : अरुणा रॉय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

तरुणांनी देशाला भीतीच्या वातावरणातून बाहेर काढले आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांनी येथे व्यक्त केले.

पुणे - देशातील ‘फॅसिझम’च्या विरोधात तरुण आता प्रश्‍न विचारू लागलेत. विरोधी पक्षांनी रचलेले हे नाटक नाही, असे आता जगभरातील लोकदेखील म्हणत आहेत. यातून निर्माण झालेले सकारात्मक वातावरण हातातून घालवून चालणार नाही. त्यामुळे तरुणांनी देशाला भीतीच्या वातावरणातून बाहेर काढले आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांनी येथे व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अरुणा रॉयलिखित ‘कहाणी माहिती अधिकाराची’ या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. अवधूत डोंगरे यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. साधना प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले. यानिमित्ताने वीणा जामकर यांनी रॉय आणि निखिल डे यांची मुलाखत घेतली. यावेळी रॉय म्हणाल्या, ‘‘देशातील तरुणांची एकवट असलेली शक्ती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना केलेली अमानुषपणे मारहाण, अशा एकामागोमाग एक घटना घडत आहेत. या सगळ्यांना एकत्रितपणे पुढे कसे घेऊन जाता येईल, हे पाहणे आता आवश्‍यक आहे. त्यासाठी नवीन व्यासपीठ निर्माण करावे लागेल. ’’

सीएए संदर्भात माहिती अधिकारात अर्ज दाखल केला होता. हा कायदा करण्याचा निर्णय कधी घेतला, कुणी घेतला आदी माहिती मिळण्याचा अर्ज केला होता. सगळी माहिती फेटाळण्यात आली. त्याविरोधात आम्ही आता अपिल करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. डे म्हणाले, ‘‘पुणे ‘आरटीआय’चा गड आहे. एस. बी. सावंत, अण्णा हजारे यांनी कायद्याला आकार दिला.’’ मकरंद साठे, अतुल पेठे, रायकुमार तांगडे, संभाजी तांगडे, अश्‍विनी भालेकर यांनी ‘दलपतसिंह’ या नाटकाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला.  विनोद शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले.

रॉय म्हणाल्या...
  ‘आरटीआय’ हे  लोकशाहीचे ‘सेलिब्रेशन’
  दलपतसिंग यांनी माहितीचा  अधिकार गोष्टीतून   कांपर्यंत पोचवला
  राज्यघटनेने संपूर्ण देशाला  एकसंध केले
  राज्यघटना आहे म्हणून  ‘आरटीआय’ आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aruna Roy Book Publication in pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: