

फोटो ः आर्या चिखलीकर
चिखलीकर, पवारची अर्धशतके
पुणे, ता. १३ ः पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटना आयोजित महिला खुल्या गटाच्या ऑक्सिरीच करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत आर्या चिखलीकर आणि समीक्षा पवारने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर स्कोअर स्पोर्ट्स अकादमीने लक्ष्य अकादमीचा ५२ धावांनी पराभव केला.
रावेत येथील चॅम्पियन्स एरिना मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्कोअर अकादमीने चार बाद १७७ धावा केल्या. यावेळी आर्या चिखलीकरने ३० चेंडूत दहा चौकारांसह ५२ धावांची तर समीक्षा पवारने सात चौकारांसह ५० धावांची खेळी केली. प्रत्युत्तर देताना लक्ष्य अकादमीला ३ बाद १२५ धावा करता आल्या. त्यांच्या तनिष्का बागूलने चौदा चौकारांसह ७० धावांची केलेली खेळी अपुरी ठरली. ‘सामन्याचा मानकरी’ हा मान आर्या चिखलीकरने मिळविला.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी रणजीपटू सुभाष रांजणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, सुशील जाधव, प्रशांत तेलंगे, आनंद नायडू, मुकेश गुजराती हे उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक ः
स्कोअर अकादमी - (२० षटकांत) ४ बाद १७७ (आर्या चिखलीकर ५२, समीक्षा पवार ५०) विजयी विरुद्ध लक्ष्य अकादमी - (२० षटकांत) ३ बाद १२५ (तनिष्का बागूल ७०, मेघना मोले नाबाद ३३, श्रेयसी वाडकर २-७).
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.