esakal | ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!
sakal

बोलून बातमी शोधा

Aarya_Koshe

मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्‍लास होता.

ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ना खासगी शिकवणी, ना अभ्यासाचं टेंशन. १०वीचा अभ्यास आहे म्हणून तिने गायन, कथ्थक नृत्य शिकणे सोडून दिले नव्हते. तरीही तिने १०वीच्या परीक्षेत १०० टक्‍के गुण मिळवत तडाखेबंद शतक मारले आहे. हे यश आहे महाराष्ट्रीय मंडळाच्या आर्या कोशे हिचे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आर्या ही उत्तम गायन करते, ती विशारद आहे. तर कथक्क नृत्य शिकत असून आत्तापर्यंत चार परीक्षा दिलेल्या आहेत. अभ्यासा व्यतरिक्त विविध गोष्टी सुरू असताना तिने १०० पैकी १०० टक्के गुण मिळवले हे विशेष आहे. 'सकाळ'शी बोलताना आर्या म्हणाली, "दहावीमध्ये १०० टक्के मिळविणे हे माझे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण केले. या स्वप्नपूर्तीसाठी मी १०वीत आल्यापासून अभ्यास सुरू केला आणि त्यात सातत्य ठेवले.

राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी

माझी आई ११वी, १२वी आणि इंजिनियरींगचे क्‍लास घेते, त्यामुळे माझ्या १०वीच्या अभ्यासाकडे तिनेच लक्ष दिले. ती जसा सांगेल तसा अभ्यास मी करत गेले. माझ्या यशामध्ये आईचा मोठा वाटा आहे. मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्‍लास होता. मग उरलेला वेळ मी अभ्यासासाठी वापरला. कार्डियाक सर्जन होणं हे माझं स्वप्न आहे, त्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top