ढेबेवाडी आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते आशा पाटील यांचा सन्मान
आशा पाटलांचा ‘महाआरोग्य सन्मान’
आशा स्वयंसेविकेच्या कामगिरीची दखल; आरोग्यमंत्र्यांकडून पुरस्कार
ढेबेवाडी, ता. ४ : विभागातील सणबूर (ता. पाटण) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिंती (ता. पाटण) येथे कार्यरत आशा स्वयंसेविका आशा लक्ष्मण पाटील यांना राज्यस्तरीय महाआरोग्य सन्मान २०२६ पुरस्काराने गौरविण्यात आले. आयुष्मान आरोग्य मंदिर जिंती अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला.
आशा पाटील २०१४ पासून डोंगरभागांतील जिंती येथे आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. आयुष्मान आरोग्य मंदिराअंतर्गत आरोग्य सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी दिलेले विशेष योगदान आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव व समाजहिताच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला. यापूर्वीही विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. महाआरोग्य २०२६ पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. टॅब, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आरोग्य सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त, आरोग्य संचालक आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आशा पाटील यांच्या सन्मानाबद्दल जिल्हा आरोग्य विभाग आणि पाटण तालुक्यातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा पाटील यांनी ‘तळमळीने व प्रामाणिकपणे बजावलेल्या सेवेची पोच या पुरस्काराने मिळाली. यापुढच्या काळातही निष्ठापूर्वक सेवा बजावत सर्वसामान्य जनतेच्या सेवेत कार्यरत राहीन’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
B08167
मुंबई : आशा पाटील यांना पुरस्कार प्रदान प्रसंगी प्रकाश आबिटकर, मेघना बोर्डीकर व मान्यवर.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

