
मार्केट यार्ड : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात रताळ्यांची आवक सुरू झाली आहे. आषाढी एकादशी रविवारी (ता. ६) आहे. मात्र, सततच्या पावसामुळे यंदा उत्पादन घटले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी जाग्यावर माल खरेदी केला आहे. त्यामुळे बाजारात आवक एक ते दीड हजार पोत्यांनी घटली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचे भाव स्थिर आहेत. रताळ्याला प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे; तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने विक्री होत आहे.