Ashadhi Wari 2023 : वारीसाठी यंदाही खास मोबाईल ॲप

वारकऱ्यांना आवश्यक माहिती मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने खास अ‍ॅप तयार केले आहे.
App for Wari
App for Warisakal

पुणे - वारकऱ्यांना आवश्यक माहिती मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने खास अ‍ॅप तयार केले आहे. ‘आषाढी वारी २०२३’ असे अ‍ॅपचे नाव असून त्यावर वारीसह आरोग्य, पाणी, वीज यांसह आवश्यक ती सर्व माहिती मिळेल.

तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या पुढाकाराने २०१७ पासून या ॲपच्या माध्यमातून वारकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या पालख्यांच्या मार्गाचे वेळापत्रक, गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची (लाइव्ह) सोय, पालखीचे विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख तसेच विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक अशी माहिती त्याद्वारे मिळते.

याशिवाय तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक; पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टँकर सुविधा, अन्नपुरवठा आणि वितरण, विद्युत सेवा, पशुधन आदींसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक अशी माहितीही ॲपवर आहे.

हे अ‍ॅप गुगल प्लेस्टोअवर अ‍ॅप उपलब्ध आहे. ते ॲप वारकऱ्यांनी डाउनलोड करावे. काही अडचण आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

तक्रार करण्याची सुविधा

एखादी व्यक्ती दिंडीत हरवल्यास अ‍ॅपवरील ‘आपण यांना पाहिलत का?’ या पर्यायाच्या माध्यमातून त्याच्या शोधासाठी प्रयत्न करता येतील. वारकऱ्यांना काही असुविधा जाणवत असल्यास अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रार करता येईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

App for Wari
Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पालिका सज्ज; स्वच्छतेसाठी पथके आणि मार्गावर मोफत उपचारांची सुविधा

माहिती पुस्तिकाही वाटणार

अ‍ॅप वापरणे शक्य नसलेल्या वारकऱ्यांसाठी पालखी सोहळ्याच्या नियोजनातील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि इतर तपशील असलेल्या माहितीपुस्तिकेच्या दोन हजार प्रतींची छपाई करण्यात आली आहे. त्याचेही वाटप केले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com