
बोरगाव : माळीनगरला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सकाळच्या प्रहरी रंगलेले उभे रिंगण, उत्साहात झालेले पादुकांचे दर्शन, वारीतील शेवटच्या टप्प्यातील वाटचाल सुरू असल्याने वैष्णवांचा भक्तीचा गजर वाढलेला, पोहचण्याची आस वाढल्याने डोळ्यात तरळणारे प्रेमाश्रू, असे भारावून गेलेले वातावरण पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी आज अनुभवले. याच भक्तिमय वातावरणात विठुरायाच्या चरणस्पर्शाचा लाभ घेण्यासाठी निघालेला सोहळा बुधवारी बोरगाव येथे विसावला.