
पुणे : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने अतिरिक्त एसटी गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यंदा स्वारगेटहून ३२५ अतिरिक्त गाड्या शनिवारी (ता. ५) आणि रविवारी (ता. ६) धावतील. यासह नियमित गाड्याही धावतील, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.