
शिवाजीनगर,ता.२१: गावामध्ये नमाज पठण करणारे, २५ वर्षापासून वारीत सहभागी असलेले मुस्लीम वारकरी यासिन अत्तार याची ही २६ वी वारी. अत्तार हे लहान असताना त्यांच्या गावामध्ये 'अखंड हरिनाम सप्ताह' बसला होता. तेव्हापासून त्यांना हरिनामाची ओढ निर्माण झाली.
विठ्ठल सेवा मंडळ, खेड ब्रुद्रुक (ता.खंडाळा, जिल्हा सातारा) येथील शंभर नंबर दिंडीसोबत ते सुरवातीला अचारी म्हणून मानधनावर काम करत पंढरपूरला जात होते. अचारी अत्तार हे आता पखवाज वादक वारकरी झाले आहेत.