
लोणंद : नीरा नदीच्या दुतर्फा लाखो भाविकांची गर्दी... टाळ-मृदंगाचा गजर... ‘माउली माउली’ नामाचा अखंड जयघोष... पादुकांवर खिळलेल्या नजरा... अशा भक्तिमय वातावरणात माउलींच्या पादुकांना नीरा नदीपात्रात स्नान घालण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सात दिवसांचा प्रवास उरकून माउलींच्या सोहळ्याने पाडेगावजवळ सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत झाले.