जेजुरी : दिवेघाटाच्या अवघड वाटेनंतर दोन दिवसांची विश्रांती घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी मंगळवारी उत्साहात चालत होते. सकाळच्या टप्प्यात पावसाची सरी आणि दुपारनंतर उन्हाचा चटका अशा वातावरणात ते सायंकाळी जेजुरीत पोहोचले. .निसर्गाच्या खेळात दंग झालेल्या माउलींच्या दळभाराचे मल्हारगडी भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ‘माउली-माउली’चा जयघोष करीत जल्लोषात स्वागत झाले. शैव-वैष्णव संप्रदायाचा संगम येथे अनुभवायला मिळाला. सासवडमधून माउलींचा पालखी सोहळा सकाळी सात वाजता जेजुरीकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी पहाटे सोहळाप्रमुख भावार्थ देखणे यांनी महापूजा केली. पंढरीच्या ओढीने सकाळच्या प्रहरी वारकऱ्यांच्या पावलांनी वेग धरला होता. साडेआठच्या सुमारास सोहळा बोरावके मळ्यात न्याहारीसाठी थांबला. दुपारी साडेअकराच्या सुमारास शिवरीत दुपारी दिंड्यांमध्ये पंगती बसल्या. .त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सोहळा मार्गस्थ झाला. आज जेजुरीत पोहोचणार असल्याने वारकऱ्यांत मल्हारीच्या दर्शनाची ओढ होती. गड दिसू लागताच दिंड्यांमधून मल्हारी देवाचे गोडवे गाऊ लागले. वैष्णवांकडून शिवाचा होणारा जयघोष मनाला भावत होता. यातूनच शैव आणि वैष्णव संप्रदायाचा मिलाप पाहायला मिळाला..साडेतीनच्या सुमारास सोहळा बेलसरजवळ आला. काहीशी विश्रांती घेतल्यानंतर तो जेजुरीच्या हद्दीत आला. जेजुरीकरही गावाच्या शिवेवर स्वागतासाठी आले होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास रथ जेजुरीच्या हद्दीत प्रवेशला आणि ‘माउली- माउली’चा घोष करीत रथावर भंडारा-खोबऱ्याची मुक्त उधळण झाली. या स्वागतानंतर पालखी तळावर पोचली. समाजआरतीनंतर माउलींची पालखी तंबूत विसावली. त्यानंतर जागर झाला..खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दीसोहळा जेजुरी मुक्कामी असल्याने वारकऱ्यांनी मल्हारगडी दर्शनसाठी गर्दी केली. त्यामुळे जाताना कपाळी बुक्का असलेले वारकरी येताना भंडारा लावून खाली येत होती. देवस्थानने वारकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या..वारीत...पालखी मार्ग चौपदरीकरणामुळे वाटचाल सुलभजेजुरी पोलिसांकडून वाहतुकीचे योग्य नियोजनहरितवारीच्या स्वच्छतागृहांची दयनीय स्थितीपालखी मार्गस्थ होताच स्वच्छतेस सुरवात.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.