
रविकिरण सासवडे
काटेवाडी :
अश्व धावती, रिंगणी धूळ उडती,
पालखीचा सोहळा, भक्ती रंगात न्हाती,
टापांचा ठेका, मनाला भिडतो खोल,
दिंडीचा उत्साह, जाणं विठ्ठल भक्ती मोल.
या काव्यपंक्ती बेलवाडीच्या अश्व रिंगणाच्या भक्तीमय उत्साहाचे यथार्थ वर्णन करतात. विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन, रिंगणात रंगलेला हा सोहळा भक्तांचे मन हरवतो आणि पंढरीच्या वारीचा उत्साह द्विगुणित करतो.