
वरवंड : चौफुला येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे संत बाळूमामांच्या बग्गा क्रमांक १५ चा सेवाभाव तुकोबारायांच्या चरणी समर्पित करण्यात आला. मेंढ्यांच्या रिंगणाने भक्तिरसाचा आविष्कार घडविला. त्यानंतर वरवंड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजता पालखी सोहळ्याचा वैभवशाली दळभार पोचला. मंदिराभोवतीची फुलांच्या पायघड्या, नामघोषाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात सोहळा वरवंड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात मुक्कामी विसावला.