यवत : देहू ते पंढरपूर ही संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील, कदमवाक वस्ती ते यवत अशी दीर्घ आणि दमछाक करणारी सोमवारची २८ किलोमीटरची वाटचाल होती. त्यामुळे सकाळपासूनच वारकऱ्यांची पावले झपझप पुढे सरकत राहिली. .चढ-उताराचा रस्ता कधी उन्हाच्या तडाख्यात तर कधी ढगाळ वातावरणाने उकाड्यात मागे पडत गेला. तरीही विठुरायाच्या भक्तीत खंड न पडू देता, नामघोषाचा अखंड प्रवाह जपत सोहळा रात्री नऊच्या सुमारास यवत मुक्कामी पोचला आणि समाज आरतीनंतर श्रद्धेने विसावला..लोणी काळभोर कदम वाकवस्ती येथील पालखीतळावर सोमवारी द्वादशीनिमित्त मालक चैतन्य महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले. त्यांनी ‘हाचि नेम आतां न फिरें माघारीं।...’ या विरहिणी अभंगाचे निरूपण केले. ‘आता आम्ही श्री विठ्ठल गोविंदाच्या सान्निध्यात चालत आहोत. आता काही अडचणी आल्या तरी कधीच मागे हटणार नाहीत. परमात्म्याचा सहवास मिळाल्याने आता आमच्या सर्व भय-चिंता निघून गेल्या आहेत. परमेश्वराच्या सान्निध्यात सुरक्षित आणि समाधानी आहोत,’ असा भावार्थ त्यांनी सांगितला..पालखीचा दुपारचा विसावा मैदानाबाहेर होता. त्याला वारकरी व ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. शिंदवणे चौकालगतच्या मैदानावर दुपारी जेवणासाठी दीड तास सोहळा थांबला. त्यावेळी उरुळी कांचन परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सूर्यास्तावेळी वाऱ्याच्या मंद झुळुकीने चालणाऱ्यांचा उत्साह वाढला. दुखणाऱ्या पावलांनी तुकोबारायांच्या नामघोषात आजची वाटचाल पूर्ण केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.