Pathan Family Food for Warkari
sakal
वाल्हे - आषाढी वारी परंपरा ही सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश देणारी आहे. याच परंपरेचे जिवंत उदाहरण म्हणजे वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुस्लिम पठाण कुटुंबीय. धर्मभेद विसरून गेली ३५ वर्षे हे कुटुंब संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना प्रेमाने पिठलं-भाकरीचं मोफत भोजन देत आहेत. ‘वारकऱ्यांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा’ या भावनेतून सुरू असलेली ही अन्नसेवा आजही अखंड सुरू आहे.