Saath Chal : विविध क्षेत्रांतून ‘साथ चल’ला भरघोस प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saath Chal

‘साथ चल’ या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देण्यात येणार आहे.

Saath Chal : विविध क्षेत्रांतून ‘साथ चल’ला भरघोस प्रतिसाद

पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून ‘सकाळ माध्यम समूहाने’ व ‘फिनोलेक्स केबल्स’च्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘साथ चल’ उपक्रमात राजकारण, समाजकारण, कला-संस्कृती, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रशासन आदी विविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था, संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.

‘साथ चल’ या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देण्यात येणार आहे. ‘साथ चल़’ उपक्रम शहरातील कॅंप परिसरातील महात्मा गांधी बसस्थानकाच्या (पूल गेट) आवारात शुक्रवारी (ता. २४) सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. पुणे शहर, उपनगर आणि परिसरातून या उपक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती, संस्था, संघटना पुढीलप्रमाणे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद, ‘पीएमपीएमएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत मिश्रा, वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अभिनेत्री अश्‍विनी कुलकर्णी, दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, जीतोचे अध्यक्ष, ओमप्रकाश रांका, राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स महाराष्ट्राचे अध्यक्ष वालचंद संचेती, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्राचे (फाम) उपाध्यक्ष राजेश शहा, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडत असोसिएशनचे अध्यक्ष बाप्पू भोसले, मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरघे, इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्ट, अध्यक्ष, अभय संचेती, काची प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवराज काची, लक्ष्मी रस्ता व्यापारी असोसिएशन, पुणे रेस्टॉरंट ॲंड हॉटेलियर्स असोसिएशन, कसबा गणपती मंडळ, गुरूजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, भाऊरंगारी गणपती मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर, रेल्वे कर्मचारी संघटना (सीआरएमएस) जे. सी. कांबळे, पीएमपीचे बीआरटी व्यवस्थापक राजेश रूपनवर, पीएमपी कर्मचारी संघटनेचे राजेंद्र खराडे, बघतोय रिक्षावाला संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ, पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना, मुकंद भवन ट्रस्ट, नवीन मराठी शाळा (शनिवार पेठ), अश्विनी महिला विकास संस्था, माणुसकीचे दूत व्यासपीठ, केशवराव जेधे मनपा शाळा क्रमांक -१६, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान (वानवडी), लक्ष्य प्रतिष्ठान (वानवडी), वंदे मातरम मित्र मंडळ, नवचैतन्य हास्ययोग परिवार (बी टी कवडे रस्ता), नवचैतन्य हास्ययोग परिवार (घोरपडी गाव), प्रगती मित्र मंडळ (घोरपडी), बी. टी. कवडे रस्ता व्यापारी संघटना, मानव सेवा संघ (बी. टी. कवडे रस्ता), अखिल मोहननगर मित्र मंडळ (धनकवडी), पार्वती महिला बचत गट, सेवा फाउंडेशन, जयनाथ मित्र मंडळ, माय माउली केअर सेंटर, प्रगती फाउंडेशन, प्रकृती केअर फाउंडेशन, जनहितम संघटना, अखिल बिबवेवाडी गावठाण भजनी मंडळ, महेश सोसायटी, गौरव घुले मित्र परिवार, बिबवेवाडी ओटा गणेश मित्र मंडळ, गणपत नगर पापळवस्ती रहिवासी संघ, रम्यनगरी सोसायटी व्यापारी संघ, स्वामी समर्थ ट्रस्ट (अप्पर बिबवेवाडी) जेएसपीएम, गंगातारा वृद्धाश्रम (वडकी), शिवराज तरुण मित्रमंडळ (उंड्री), युवक मित्रमंडळ (उंड्री), गगन अॅरॅन्यू सोसायटी, क्रोम हौसिंग सोसायटी (उंड्री), पद्मावती तरुण मंडळ (पिसोळी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उंड्री), रचना विद्यालय (होळकरवाडी), म. ज्योतिराव फुले हायस्कूल (पिसोळी), डॉ. दादा गुजर विद्यालय (महंमदवाडी) गंगा व्हिलेज सोसायटी (हांडेवाडी रस्ता), जय महाराष्ट्र मित्रमंडळ (महंमदवाडी), एस. आर. व्हिक्टरी स्कूल (काळेपडळ), नवसुराज्य प्रतिष्ठान (सातवनगर), कर्तव्य फाउंडेशन (कॅम्प), आलवसा फाउंडेशन, समता सामाजिक संस्था, हिंद तरुण मंडळ (कॅंप), केअर टेकर सोसायटी, एम. एस. व्ही. फाउंडेशन, शिव सेवा भीम सेवा प्रतिष्ठान, हिंद माता प्रतिष्ठान, अंजली एनजीओ, महाराष्ट्र तरुण मंडळ (काशेवाडी), श्रीकृष्ण तरुण मंडळ (ताबूत स्ट्रीट), शिवराम तरुण मंडळ (कॅम्प), श्रीपाद तरुण मंडळ (शिंपी आळी), जय जवान तरुण मंडळ (कोळसे गल्ली), नवयुवक तरुण मंडळ (शिंपी आळी), नव महाराष्ट्र तरुण मंडळ (कोळसे गल्ली), नवचैतन्य तरुण मंडळ (एमजीरोड), नवयुवक सुवर्णकार मंडळ (जाफरीन लेन), वीर तरुण मंडळ (सेंटर स्ट्रीट), आदर्श तरुण मंडळ (बिशप स्कूल कंपाउंड), एकता मित्र मंडळ (खान रोड), ओशो मित्र मंडळ(सेंटर स्ट्रीट कॅम्प), राजेश्वर तरुण मंडळ (बाबाजान चौक), दत्त समाज तरुण मंडळ (सेंटर स्ट्रीट), ताबूत स्ट्रीट मंडळ, एकता मित्र मंडळ (बाटलीवाला गार्डन), दस्तुर मेहेर तरुण मंडळ (मेहेर रोड).

Web Title: Ashadhi Wari Saath Chal Big Response Sant Tukaram Maharaj And Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top