Ashadhi Wari : संतश्रेष्ठांच्या पालख्यांचे शनिवारी पंढरीकडे प्रस्थान; नाना पेठ, भवानी पेठेसह सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. ११) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान होणार आहे.
sant dnyaneshwar maharaj and sant tukaram maharaj palkhi sohala

sant dnyaneshwar maharaj and sant tukaram maharaj palkhi sohala

sakal

Updated on

पुणे - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. ११) श्रीक्षेत्र पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, शहराच्या मध्यवर्ती भागातील नाना पेठ, भवानी पेठेसह पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत शनिवारी मध्यरात्री दोनपासून टप्प्याटप्प्याने बदल करण्यात येणार आहेत. पालखी सोहळा मुख्य मार्गावर मार्गस्थ झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com