
पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आणि लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्याने संपूर्ण शहर हरिनामाच्या गजराने भारावून गेले. सकाळपासूनच विविध भागांतून टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांचे पथक शहरातील रस्त्यांवर दाखल होत होते. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख रस्ते सुंदर रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. पालखीच्या आगमनाने पुण्यात एक उत्सवमय वातावरण निर्माण झाले असून, विविध सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.