Sant Dnyaneshwar maharaj Palkhi
sakal
आळंदी - आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. सोहळा २४ जुलैला पंढरीत पोहोचणार असून, परंपरेप्रमाणे तीन उभी रिंगणे, चार गोल रिंगणे होतील. पुणे आणि सासवडमध्ये सोहळा प्रत्येकी दोन मुक्कामी राहणार असून, अन्य ठिकाणी प्रत्येकी एक मुक्काम असणार आहे. ३३ दिवसांचा प्रवास करून सोहळा ८ ऑगस्ट रोजी आळंदीत परतणार आहे.